
क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील एनसीबीची धाड आता संशयाच्या फेऱयात सापडली आहे. या पार्टीत सहभागी झालेला आणि सध्या आर्थर रोड तुरुंगात असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला ‘मुक्त’ करण्यासाठी तब्बल 25 कोटींची मागणी करण्यात आली होती. 18 कोटींवर डील झाली असती तर त्यातील आठ कोटी एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडेंना मिळणार होते, अशी खळबळजनक माहिती या प्रकरणातील ‘फरार’ पंच किरण गोसावी याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने दिली आहे. विशेष म्हणजे, साईल याने 2 ऑक्टोबरच्या रात्री क्रूझ ते एनसीबी ऑफिस यादरम्यान नेमके काय घडले, गोसावीचा वानखेडे यांना झालेला व्हॉटसअॅप कॉल, सॅम नामक मध्यस्थाचा आणि शाहरुखच्या महिला मॅनेजरचा या प्रकरणातील प्रवेश याची माहितीच एका प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. साईल याच्या या प्रतिज्ञापत्रामुळे एकीकडे खळबळ उडालेली असतानाच समीर वानखेडे आणि त्यांची एनसीबी यांच्या कारवाईबद्दलच संशय व्यक्त होत आहे.
2 ऑक्टोबरच्या संध्याकाळी मुंबईच्या समुद्रात एका क्रूझवर धाड टाकली आणि ड्रग्ज पार्टी उद्ध्वस्त करून 13 जणांना ताब्यात घेतल्याचा दावा एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी केला होता. अटक केलेल्यांमध्ये अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याचाही समावेश असल्याने हे प्रकरण हायप्रोफाईल बनले. मात्र कारवाईबद्दल सुरुवातीपासून संशय व्यक्त केला जात होता. राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी तर सलग तीन पत्रकार परिषदा घेऊन समीर वानखेडे आणि त्यांची एनसीबी यांच्या कारवाईबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या धाड प्रकरणात किरण गोसावी हा भाजपशी संबंधित असलेला फरार आरोपी पंच म्हणून पुढे होता. त्याचे आर्यनसोबतचे फोटोही प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंगही मिळाला होता.
प्रभाकर साईल याची ‘एण्ट्री’
आजपर्यंत सतत संशयाच्या गर्तेत सापडलेल्या या ड्रग्ज पार्टी प्रकरणाला आता नवा ट्विस्ट आला आहे आणि तो खूपच धक्कादायक आहे. या प्रकरणातील एक पंच आणि फरार किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने आज एक खळबळजनक प्रतिज्ञापत्र प्रसारमाध्यमांकडे सोपवले. आर्यन खान याला या प्रकरणातून सहिसलामत बाहेर काढण्यासाठी गोसावी याने तब्बल 25 कोटींची मागणी केली होती. मागणी 25 कोटींची असली तरी डील 18 कोटींवर फायनल करावे. त्यातील आठ कोटी समीर वानखेडे यांना द्यायचे आणि उर्वरित 10 कोटी आपापसात वाटून घ्यायचे असे गोसावी आणि त्याचा या प्रकरणातील मध्यस्त मित्र सॅम यांचे बोलणे झाल्याचा दावा साईल याने केला आहे.
वानखेडेंना गोसावीचा व्हॉटस्अॅप कॉल
किरण गोसावी एकीकडे सॅम आणि पूजा ददलानी यांना हॅण्डल करत असताना त्याने पहाटे साडेचार वाजता समीर वानखेडे यांना व्हॉटस्अॅप कॉल केला होता. डील करतोय. फायनल झाले की तुम्हाला सांगतो, असे गोसावीने वानखेडेंना सांगितले आणि फोन बंद केला, अशी माहितीही साईल याने दिली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांचा या डीलिंग प्रकरणात नेमका रोल काय अशी विचारणा आता होत आहे.
15 दिवसांनंतर का समोर आलो?
एनसीबीने धाड टाकल्यानंतर इतके दिवस उलटले. तोपर्यंत साईल कुठे होता, तो सोलापूरला नातेवाईकाच्या घरी होता. बायकोचा सतत फोन येऊ लागला. त्यानंतर साईलने तेथील स्थानिक राजकीय नेत्यांशी चर्चा केली आणि नंतरच हे प्रतिज्ञापत्र तयार करण्याचा निर्णय घेतला. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना साईल याने ही माहिती दिली.
वानखेडेंची पोलीस आयुक्तांकडे धाव
समीर वानखेडे यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली असून पुढील कारवाईपासून संरक्षण मिळावे, अशी विनंती त्यांनी एका पत्राद्वारे केली आहे. काही अज्ञातांकडून मला या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवण्याचा प्रयत्न असून काही राजकीय नेत्यांनी तर मला थेट तुरुंगातच पाठवणार, असे वक्तव्य केले आहे. म्हणूनच चुकीच्या माहिती आधारे माझ्यावर कायदेशीर कारवाई होऊ नये, असे वानखेडे यांनी म्हटले आहे.
2 आणि 3 ऑक्टोबरला नेमके काय घडले?
2 ऑक्टो., सकाळी 7.30 Š गोसावीचा साईलला पह्न आला. 500 रुपये जी पे केल्याचे सांगून ताबडतोब सीएसटीला पोहचण्यास सांगण्यात आले. साईल सीएसटी स्थानकात उतरल्यावर एनसीबीचे लोकेशन गोसावीने पाठविले.
9.45Š साईल एनसीबी कार्यालयाखाली उभा असताना एनसीबीचा एक अधिकारी व गोसावी खाली उतरून इनोव्हामध्ये बसले. दोन मिनिटांनंतर समीर वानखेडे कार्यालयातून खाली आले. इनोव्हाच्या मागून वानखेडे त्यांच्या गाडीतून रवाना झाले.
दुपारी 12.15Š किरण गोसावीने पह्न करून फ्रँकी, बॉटल्स, कोल्ड्रिंक्स घेतल्या. ग्रीन गेटमधून आम्ही ते घेऊन आत गेलो. आत समीर वानखेडे व एनसीबीचे अधिकारी बसलेले होते. साईलला मुख्य गेटजवळ उभे करण्यात आले. मग पह्टो पाठवून त्यापैकी कोण व्यक्ती आत येतो ते सांग म्हणून बोलण्यात आले. दुपारी 1.30 Š गोसावीने साईलला व्हॉटस्अॅपवर पह्टो पाठविले. पह्टोमधील सफेद रंगाचा टीशर्ट घातलेल्या तरुणाला ओळखल्याचे साईलने गोसावीला कळवले.
दुपारी 4.30Š गोसावीचा साईलला मेसेज आला की, त्या फोटोतल्या तरुणाला पकडले. लगेच एक मिनिटात दुसरा मेसेज आला की, 13 जणांना आतापर्यंत पकडले.
संध्याकाळी 7.00 नंतर Š किरण गोसावी गाडीजवळ आला आणि गाडीतच कपडे बदलले. त्याने टीशर्ट व जिन्स घातली. मग सोबत आम्ही आत गेलो.
8.00 नंतर Š गोसावीचा साईलला कॉल आला आणि गाडी आतमध्ये आणण्यास सांगण्यात आले. येलोगेटमार्गे गाडी आत नेण्याचा प्रयत्न केला, पण परवानगी मिळाली नाही.
रात्री 11.00Š साईल ग्रीन गेटमधून आत गेला तेव्हा एनसीबीने पकडलेले तरुण तेथे होते. आर्यन खानला एका केबिनमध्ये बसवून ठेवलेले दिसला. तेथे आणखी पाच-सात जण होते. साईलने त्याच्या मोबाईलमध्ये त्या सर्वांचे पह्टो काढले.
रात्री 11.45Š तेथून सर्व निघू लागले. समीर वानखेडेंनी एनसीबीच्या गाडय़ा आत आणल्या. गोसावीची भाडेतत्त्वावर वापरत असलेली इनोव्हादेखील परवानगी मिळवून आत आणण्यात आली. त्यानंतर किरण गोसावी आर्यन खानसह एनसीबी कार्यालयाच्या दिशेने निघून गेले.
पहाटे 1.00Š गोसावीचा कॉल आला आणि साईलला एनसीबीच्या कार्यालयात बोलावण्यात आले. त्यावेळी एनसीबीच्या एका अधिकाऱयाने कोऱया कागदावर सह्या करण्यास सांगितले; पण कागद कोरे असल्याचे साईल म्हणताच, तू कर सही. काही नाही होत असे समीर वानखेडे त्याला म्हणाले.
पहाटे 2.30Š एनसीबी कार्यालयातून साईल आणि गोसावी खाली उतरले. तेव्हा गोसावीला सॅम नावाच्या व्यक्तीचा कॉल आला. एनसीबी कार्यालयापासून 500 मीटर अंतरावर त्यांची मीटिंग झाली. तेथे काही तरी डीलबद्दल ते बोलत होते.
पहाटे 4.30Š सॅम व आम्ही आमच्या गाडीतून तेथून निघालो. लोअर परळला ब्रीजखाली आमची गाडी थांबली. मागोमाग सॅमची इनोव्हा क्रिस्टा गाडी आली. लगेचच त्या गाडीच्या मागे निळय़ा रंगाची मर्सिडीज आली. मर्सिडीजमध्ये शाहरुखची महिला मॅनेजर होती. गाडीतच तिघांमध्ये मीटिंग झाली. गाडीतून त्यांनी पह्न केला, 25चा बॉण्ड टाक, लास्ट 18ला कर, आठ वानखेडेंना जाणार आहेत. दहा आपल्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत. हे पह्नवरचे संभाषण साईलने ऐकले.
5.30 वाजता Š मंत्रालयासमोरील रस्त्यावर जाऊन उभे राहिले. तेथून गोसावी व साईल वाशीच्या दिशेने रवाना झाले. वाशीला गेल्यानंतर ताडदेव येथील इंडियाना हॉटेलजवळून 50 लाख घेण्यास गोसावीने साईलला सांगितले.
सकाळी 9.30Š इंडियाना हॉटेलजवळ कारने आलेल्या व्यक्तीकडून 50 लाख घेऊन साईल वाशीला गेला.
संध्याकाळी 4.30Š गोसावीने वाशीच्या इनऑर्बिट मॉलजवळ साईलला बोलावले. पैशाची पिशवी देऊन ते सॅमला परत करण्यास गोसावीने सांगितले.
चर्चगेटला ‘ट्रायडण्ट’जवळ पैशाची पिशवी साईलने सॅमकडे दिली.
एसआयटी चौकशी करा -मलिक
दहशत निर्माण केली जातेय, मोठी वसुली केली जातेय. मुंबईत जे अमली पदार्थांप्रकरणी गुन्हे होत आहेत त्या सर्व प्रकरणात वसुली केली जात आहे. त्यांचाच माणूस समोर येऊन सांगतो आहे. यामुळे या प्रकरणात कुठेतरी या घटनेची दखल घेऊन एसआयटी नेमून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवत्ते मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. या प्रकरणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशीही बोलणार आहोत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. गोसावीच्या बॉडीगार्डनेच आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणी गौप्यस्पह्ट केला आहे. हे षड्यंत्र आता समोर आले आहे. यामुळे आता या प्रकरणी चौकशी व्हायलाच हवी, असे ते म्हणाले.
पोलिसांनी स्वतःहून तपास करावा -राऊत
या आरोपांचा तपास महाराष्ट्र पोलिसांनी स्वतःहून दखल घेऊन करावा. मुंबईत असे प्रकार घडवले जात आहेत आणि महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. मुंबईचे पोलीसदेखील अमली पदार्थ पकडत आहेत. पण हे दोन ग्रॅम, अर्धा ग्रॅम, पाव ग्रॅम पकडतायत आणि महाराष्ट्राला बदनाम करतायत. एनसीबीचे अधिकारी, त्यांचे पंच पिंवा आत्ता समोर आलेल्या माहितीसंदर्भात तत्काळ कठोर कारवाई व्हायला हवी, असे सांगतानाच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी एनसीबीच्या प्रत्येक कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पण यांच्यावर कुणी बोलले तर भाजपाला असा काही पान्हा फुटतो, जणू काही त्यांच्या गर्भातूनच हे लोक जन्माला आले आहेत, असा टोला लगावला.
उच्चस्तरीय चौकशी करावी -पटोले
महाराष्ट्राची बदनामी करण्याचा एक सुनियोजित कट असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांतील एनसीबीच्या कारवाया पाहिल्यावर त्यासुद्धा याच कटाचा भाग आहेत. या प्रकरणातील साक्षीदार आणि स्वतंत्र पंच प्रभाकर साईल याने प्रतिज्ञापत्र आणि व्हिडीओ जारी करून हे प्रकरण दाबण्यासाठी शाहरूख खानकडे 25 कोटी रुपये मागितले होते; पण 18 कोटी रुपयांत सौदा पक्का झाला होता, असा गौप्यस्पह्ट केला आहे. तसेच एनसीबी अधिकाऱयांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचेही म्हटले आहे. त्याने केलेले आरोप अत्यंत गंभीर असून एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
बरेच लोक असण्याची शक्यता -पाटील
25 कोटींच्या मागणीचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आता त्या पार्टीत अमली पदार्थ खरोखर होते का? ते तिथे कसे पोहोचले? की कोणी ठेवले होते, याचा तपास व्हायलाच हवा. भाजपशी संबंधित लोक आर्यनला हात धरून बाहेर आणताहेत आणि नंतर पैशांची मागणी होत असेल तर यात बरेच लोक असण्याची शक्यता आहे. पेंद्र सरकार आणि भाजप तपास एजन्सीचा दुरुपयोग करते, पैसे उकळण्याचे काम करते, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
निळय़ा रंगाच्या मर्सिडीजमधून पूजा ददलानी आली
शाहरुख खानची महिला मॅनेजर पूजा ददलानी ही पहाटे साडेतीन वाजता आपली निळय़ा रंगाची मर्सिडीज कार घेऊन लोअर परळ येथे आली होती. गोसावी, सॅम आणि पूजा या तिघांचीही तिच्या कारमध्ये मीटिंग झाल्याची माहितीही साईल याने दिली आहे.
एनसीबी म्हणते, आरोप तथ्यहीन
साईलच्या प्रतिज्ञापत्रावर एनसीबीने संध्याकाळी प्रसिद्धीपत्रक काढले आणि साईल याचे आरोप तथ्यहीन असल्याचे सांगितले. पुढील कारवाईसाठी सदर प्रतिज्ञापत्र वरिष्ठांकडे पाठवू, असे एनसीबीचे मुथा जैन यांनी म्हटले आहे.
गोसावीचा वानखेडेंना व्हॉटस्ऍप कॉल
रविवार 3 ऑक्टोबर पहाटे 4.30 वाजता
साहेब, डील करतोय… फायनल झालं की तुम्हाला सांगतो.
किरण गोसावी मोबाईलवर आर्यनचे कुणाशी बोलणे करून देत आहे?
प्रभाकर साईल याने खळबळजनक माहिती देतानाच एक व्हिडीओही प्रसारित केला आहे. त्यात किरण गोसावी हा त्याच्या मोबाईलवर आर्यनचे कुणाशी तरी बोलणे करून देत असल्याचे दिसते. ‘ती’ व्यक्ती कोण?
कोण हा प्रभाकर साईल?
प्रभाकर राघोजी साईल (40) हा अंधेरी पूर्वेला राहतो. 22 जुलै 2021 पासून गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून तो काम करतो.
कोऱया कागदावर सह्या घेतल्या; साईलला पंच बनवले
प्रभाकर साईल याला या प्रकरणात एनसीबीने पंच बनवले, पण दहा कोऱया कागदांवर सह्या करण्यास साळकर नावाच्या अधिकाऱयाने सांगितले. याला साईल याने आक्षेप घेतला असता तेथे उपस्थित असलेल्या समीर वानखेडे यांनी, कर रे बिनधास्त सह्या. मी बघतो पुढचं, असे साईलला सांगितले. कोऱया कागदांवर सह्या करून तो या प्रकरणाचा पंच झाला.






























































