अमली पदार्थ तस्करीत पोलिसांचाच हात, एका वर्षात 15 पोलीस बडतर्फ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीत वाढ झाली असून पोलिसांच्या सहकार्यानेच अमली पदार्थांची विक्री व वाहतूक सुरू असल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. अशा 25 पोलिसांवर गेल्या वर्षभरात कारवाई करण्यात आली. त्यातील 15 पोलिसांना बडतर्फ तर 10 जणांना निलंबित करण्यात आले, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

निर्मल नगर पोलीस ठाण्यातील एक अधिकारीच अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी सरकारला दिला होता. मात्र त्यावर अद्याप काहीच कारवाई झालेली नाही. ही बाब त्यांनी आज विधानसभेत निदर्शनास आणून दिली. अहिल्यानगर येथे अमली पदार्थ पकडण्यात आल्यानंतर त्यातील अडीच कोटींच्या अमली पदार्थांची पोलिसांनीच विक्री केली अशी माहिती आमदार हेमंत ओगले यांनी सभागृहात दिली. त्यावर गृहराज्यमंत्री कदम यांनी सरदेसाई यांनी दिलेल्या व्हिडीओची संपूर्ण चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले.

z अमली पदार्थ तस्करीत आढळणाऱ्यांवर मोक्काअंतर्गतच कारवाई केली जात असल्याने त्यात गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले