
सामना प्रतिनिधी । मुंबई
बॉलीवूड इंडस्ट्रीतील सेलिबेटी तसेच हायप्रोफाईल नशेबाजांना मनाली क्रिम या महागडय़ा चरसची विक्री करणाऱया नदीम रफिक मन्सुरी ऊर्फ गुड्डू याला पकडल्यानंतर एक नवी बाब समोर आली आहे. गुड्डू आणि त्याचे सहकारी व्हॉटस्ऍपवरून मनाली चरसची डींिलंग करतात. आपले बोलणे कोणाला कळू नये यासाठी अगदी सुमडीत काम करण्यासाठी ते व्हॉटस्ऍप मेसेज किंवा व्हॉईस मेसेजचा वापर करतात.
अंमली पदार्थविरोधी पथकाच्या वरळी युनिटने दोन दिवसांपूर्वी माहीमच्या कापड बाजार परिसरात नदीम रफिक मन्सुरी ऊर्फ गुड्ड या ड्रग्ज तस्कराला मनाली क्रिम या महागडय़ा चरस साठय़ासह रंगेहाथ पकडले होते. तेव्हा गुड्डू आणि त्याचे सहकारी हायप्रोफाईल नशेबाजांना व्हॉटस्ऍपवरून संपर्प साधतात. त्यांच्याकडे कोणता चरस किती प्रमाणात उपलब्ध आहे, त्याची किंमत किती याची माहिती हायप्रोफाईल नशेबाजांना सांगतात. त्यानंतर सौदा ठरल्यानंतर डिलेव्हरी देण्यासाठी कुठे आणि कधी येणार, कोण द्यायला येणार याची इंत्थभूत माहिती हे तस्कर व्हॉटस्ऍपवर मेसेज अथवा व्हाईस मेसेजच्या माध्यमातून ठरवायचे.
पेडलरची चतुराई
आपल्यातली ड्रग्जची डीलिंग तिसऱया कोणाला समजू नये आणि पोलिसांनाही खबर लागू नये म्हणून हे ड्रग्ज तस्करी व्हॉटस्ऍपचा आधार घेत असल्याचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले. बरेच पेडलर्स अनाडी आहेत. त्यांना मेसेज टाईप करता येत नाही. त्यामुळे ते व्हॉईस मेसेजच्या आधारे ड्रग्जच्या खरेदी विक्रीचा धंदा करतात असेही लांडे म्हणाले.



























































