
दिल्ली युनिव्हर्सिटीच्या (DU) कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेत यंदा अनोखा ट्रेंड पाहायला मिळत आहे. अनेक विद्यार्थी बीए (ऑनर्स) फिलोसॉफीच्या वर्गात प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहे. असे पहिल्यांदा घडत आहे की दिल्ली युनिव्हर्सिटीच्या अर्ध्याहून अधिक कॉलेजेसमध्ये फिलोसॉफी अनारक्षित जागा जवळपास पूर्ण भरल्या आहेत.
कॉलेजचे प्राध्यापक आणि शिक्षक यांच्या अंदाजानुसार कट-ऑफ कमी झाल्याने यंदा फिलोसॉफीकडे ओढा वाढला आहे. कोविड19 सारख्या साथ रोगाच्या काळात ऑनलाइन अभ्याक्रम सुरू होता. फिलोसॉफीचे विषय ऑनलाइन काळात जास्त चांगल्या पद्धतीने शिकता आले. इतर अभ्यासक्रमांना त्यातुलनेत बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे विद्यार्थी या विषयाकडे वळले असावेत असा एक अंदाज बांधला जात आहे. तसेच यूपीएससी सारख्या परीक्षांची तयारी करण्यात फिलोसॉफी सारख्या विषयांची बरीच मोठी मदत होते.
दिल्ली युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येणाऱ्या 15 पैकी 7 कॉलेजमधील फिलोसॉफीच्या सर्व जागा भरल्या आहेत. यामध्ये मिरांडा हाउस सारख्या प्रमुख कॉलेजचे नाव देखील समाविष्ट आहे. त्यासोबतच हिंदू कॉलेज, लेडी श्री राम, लक्ष्मीबाई कॉलेज आणि श्यामा प्रसाद मुखर्जीसारखी नावे देखील आहेत.
























































