गरोदरपणात त्यांनी मला जेवण दिले नाही, मेकअपही करू दिला नाही; कुमार सानूच्या माजी पत्नीने केले धक्कादायक आरोप

प्रसिद्ध बॉलीवूड गायक कुमार सानू हे बॉलीवूडचे “मेलडीचा राजा” म्हणून ओळखले जातात. त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सर्वांना माहिती आहे, पण आता त्यांचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत आहे. त्यांची पहिली पत्नी रीता भट्टाचार्य यांनी अलीकडेच एका मुलाखतीत अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. यात त्यांनी त्या गरोदर असताना कुमार सानू यांनी त्यांचा कसा मानसिक आणि शारीरीक छळ केला होता हे सांगितले आहे. त्यांनी असाही खुलासा केला आहे की, त्यांना पार्लरमध्ये जाण्याची किंवा वॅक्सिंग करण्याची परवानगी नव्हती. “आशिकी” च्या यशानंतर कुमार सानू हे यशाच्या शिखरावर होते. परंतु यानंतर मात्र त्यांचे वर्तन बदलू लागल्याचेही त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितले.

फिल्म विंडोला दिलेल्या मुलाखतीत रीता भट्टाचार्य म्हणाल्या, “माझ्या गरोदरपणात त्यांनी मला कोर्टात खेचले. त्या काळात त्यांचे अफेअर देखील होते, जे आज उघड झाले आहे. त्यांनी मला कोर्टात खेचले. मी त्यावेळी खूप लहान होते. मला असे वाटले की माझे संपूर्ण जग उध्वस्त झाले होते. माझ्यासोबत माझ्या कुटूंबालाही यामुळे धक्का बसला होता.”

अभिनयाच्या मोहामुळे कुमार सानूने त्यांची गायन कारकीर्द सोडली. पण त्यानंतर मात्र त्यांना इंडस्ट्रीमध्ये काम मिळाले नाही. रीताने असाही खुलासा केला की, त्यांना घराबाहेर पडण्याची, मित्रांना भेटण्याची किंवा मेकअप करण्याची परवानगी नव्हती. तिची एकमेव साथीदार तिची वहिनी होती. गरोदरपणात योग्य जेवणही दिले जात नव्हते. एके दिवशी त्यांनी स्वयंपाकघराला देखील कुलूप लावले होते. जेव्हा ते घराबाहेर पडायचे, तेंव्हा स्वयंपाकघरातील खाण्याच्या वस्तू ठेवलेल्या कपाटांना कुलूप लावायचे.

रीता पुढे म्हणाल्या, कुमार सानू अनेकदा न्यायालयात त्यांची थट्टा करायचे, “जेव्हा जान माझ्या पोटात होता तेव्हा मला अन्नही मिळत नव्हते.”

कुमार सानूचा १९८६ मध्ये रीता भट्टाचार्यशी लग्न झाले. त्यांना तीन मुले आहेत. झिको, जरी आणि जान कुमार सानू. १९९४ मध्ये त्यांच्या घटस्फोटाचे कारण कुमार सानूचे कुनिका सदानंदनसोबतचे प्रेमसंबंध होते. घटस्फोटानंतर तिन्ही मुलांचा ताबा रीता यांच्याकडे आला.