
राजधानी दिल्लीमध्ये सकाळी 9 च्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची 4.1 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली असून, तब्बल 10 सेकंद हे भूकंपाचे धक्के जाणवत होते. भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
दिल्ली एनसीआर सह गाझियाबाद, नोएडा या भागात हे भूकंपाचे धक्के मोठ्या प्रमाणात जाणवले. रोहतक मध्ये भूकंपाचा केद्रबिंदू होता. भूकंपाचे धक्के जाणवताक्षणी अनेकांनी घराबाहेर पळ काढला. अनेक कार्यालयांमधील कर्मचारी सुद्धा कार्यालयाबाहरे धावले.
सविस्तर वृत्त लवकरच…