नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्याला भूकंपाचे हादरे; नागरिकांची घराबाहेर धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाडा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. नांदेड, हिंगोली परभणी जिल्ह्याला भूकंपाचा धक्का बसला आहे. पहिला धक्का सकाळी 6 वाजून 8 मिनिटांनी बसला, तर दुसरा धक्का 6 वाजून 19 मिनिटांनी बसला. रिश्टल स्केलवर पहिल्या धक्क्याची तीव्रता 4.5, तर दुसऱ्या धक्क्याची तीव्रता 3.6 मापण्यात आली. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली.

गुरुवारी सकाळी सहा ते साडे सहाच्या दरम्यान नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात भूगर्भातून आवाज येऊ लागला आणि भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सदर धक्क्यांची नोंद रिश्टल स्केलवर 4.5 आणि 3.6 अशी झाली आहे. या भूकंपामुळे कोणत्याती प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र या धक्क्यांमुळे नागरिक भल्या पहाटे उठून रस्त्यावर आले.

दरम्यान, नांदेड शहर आणि जिल्ह्यासह मुदखेड, अर्धापूर तसेच हिगोली, वसमत, औंढा व कळमनुरी तालुक्यातील काही गावांमध्ये आणि उमरखेड, पुसद भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. विशेष म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)