तापी नदीच्या खोऱयात भूकंपाचे धक्के, 3.2 रिश्टर स्केलची नोंद

शहादा तालुक्यातील तापी नदीच्या खोऱयात शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास भुकंपाचे धक्के जाणवले. शहादा तालुक्यातील सावळदा येथे असलेल्या भुकंप मापन पेंद्रात या भुकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी नोंदविली गेली. नंदुरबार जिह्यातील शहादा शहरासह तालुक्यातील टेंभे, जयनगर, वडाळी, खैरवे, तिखोदा, कहाटुळ, देऊर या गावांना भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. प्रत्यक्ष अनुभव घेणाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे दीड मिनिटे भुकंपाचे धक्के जाणवले. घराच्या मांडणीतील भांडी पडली. त्यामुळे अनेकांनी घराबाहेर धाव घेतली.

शहादा तालुक्यातील तापी नदीच्या खोऱयात शनिवारी दुपारी भुकंपाचे धक्के जाणवले. दुपारी 1 वाजून 26 मिनिटांनी सुमारे दीड मिनिटे भुकंपाचे धक्के जाणवले. शहादा तालुक्यातील सावळदा येथील भुकंप मापन पेंद्रावर या भुकंपाची नोंद 3.2 रिश्टर स्केल अशी नोंदविण्यात आली. पेंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी 1 वाजून 26 मिनिटांनी 21.63 अंशांश ते 74.66 रेखांशादरम्यान असलेल्या 98 किलोमीटरच्या क्षेत्रात सुमारे 4.4 किलोमीटर खोलीपर्यंत भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. भुकंपाचे धक्के प्रभाव क्षेत्रातील अनेक गावांनी अनुभवले.

आपली प्रतिक्रिया द्या