
काळी मिरी आणि तुपाचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते. शरीरात दीर्घकाळ जळजळ झाल्याने हृदयविकार, पक्षाघात, कर्करोग, मधुमेह आणि स्वयंप्रतिकार रोग, सांधेदुखी, मानदुखी आणि गुडघेदुखी होऊ शकते. हळद, तूप आणि काळी मिरी यांचे मिश्रण जळजळ आणि या रोगांचा प्रादुर्भाव कमी करू शकते.
आपल्या मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी तिन्ही घटक एकत्रितपणे अद्भूत ठरू शकतात. तूप आणि काळी मिरी (जे हळदीमधील कर्क्यूमिन रक्तप्रवाहात शोषून घेण्यास मदत करते) सोबत हळद सारख्या दाहक-विरोधी मसाल्याचे सेवन केल्याने, आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. यामुळे अल्झायमर, स्मृतिभ्रंश आणि पार्किन्सन रोगाचा धोका कमी होतो.
तुपाच्या नियमित सेवनाने दृष्टी वाढवता येते. यासाठी देशी तुपाच्या काही थेंबात काळी मिरी पावडर मिसळून रोज सेवन करायला हवा. तसेच पायाच्या तळव्यावर तूप लावल्यानेही दृष्टी कमी होते. तूप हे व्हिटॅमिन ए चा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे यामुळे आपले आरोग्य सुधारण्यास मदत होते.
हिवाळ्यात सांधेदुखीची समस्या वाढते. यापासून आराम मिळण्यासाठी तूप आणि काळी मिरी यांचे सेवन करावे. यासाठी काळी मिरी भाजून तुपासोबत खावी. हे मिश्रण साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासही उपयुक्त आहे.
काळी मिरी आणि तूप हे दोन्ही औषधी गुणधर्मांचे भांडार आहेत. तुपात हेल्दी फॅटी ऍसिड असते तर काळ्या मिरीमध्ये डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात. यामुळेच या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने शरीरात साचलेली घाण बाहेर पडते आणि पचनक्रिया मजबूत राहते.
तूप आणि काळी मिरी यांचे मिश्रण हृदय निरोगी आणि मजबूत बनवू शकते. या दोन गोष्टी एकत्र सेवन केल्याने शरीरात एंजियोजेनेसिसला चालना मिळते. ही एक प्रक्रिया आहे जी शरीराला रक्तवाहिन्या निर्माण करण्यास परवानगी देते. यामुळे रक्ताभिसरण सुधारून हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.