
हिंदुस्थानात गाईला मातेसमान पूजतात. तिच्याबरोबर दुर्व्यवहार करणाऱयांना आम्ही चांगला धडा शिकवू. हिंदुस्थानात गाईला मारणे आणि गोमांस खाणे हा गुन्हा आहे असे सांगत जे बुद्धिजीवी गोमांस खातात त्यांनी कुत्र्याचे मांसही खावे, असे आक्षेपार्ह विधान पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि खासदार दिलीप घोष यांनी केले आहे. वर्धमान येथील एका रॅलीत बोलताना घोष यांनी बुद्धिजीवींवर टीका केली.
देशी गाईचे दूध सोनं, परदेशी गाय आंटी
देशी आणि परदेशी गाईंबद्दल माहिती सांगताना ते म्हणाले, ‘ज्या परदेशी गाई आहेत त्या मुळात गाई नाहीत. त्या एक प्रकारचे प्राणी आहेत. त्यामुळे त्यांची पूजा करू नये. देशी गाईंचे दूध हे सोन्यासारखे पवित्र असते. ते प्यायल्याने आपले आरोग्य चांगले राहते त्यामुळे देशी गाईची पूजा करावी.’
आपली प्रतिक्रिया द्या