चवीनं खा, निरोगी राहा!

भारती पाटील म्हणजे नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकेतील  प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व. त्या सांगतात, बारीक असणे आणि हेल्दी असणे या दोन्ही वेगवेगळय़ा गोष्टी आहेत. एखादी व्यक्ती जर वजनाने 50-60 किलोची आहे, पण ती जर आरामात पन्नास सूर्यनमस्कार घालत असतील तर ते हेल्दी आहेत. त्यांचं आरोग्य एकदम उत्तम आहे. भारती दररोज 50 सूर्यनमस्कार घालतात. जसा वेळ मिळेल तशा त्या

वॉकला जातात. झोप व्यवस्थित झाली पाहिजे, निरोगीपणाचे ते लक्षण आहे, असे त्या सांगतात.

भारती पाटील  फुडी आहेत. चिकन, मटन त्या जास्त खात नाहीत. त्यांना मासे खूप आवडतात. खायला तळलेला मासा, सुका मासा, भरलेला मासा, माशाची आमटी सर्व माशाचे पदार्थ आवडतात. त्यांना स्वयंपाकाची फार आवड आहे. 2000 सालामध्ये त्यांनी क्रीम केक बनवण्याचा कोर्स केलेला आणि त्या क्रीम केक इतका उत्तम बनवतात की, प्रत्येकाच्या वाढदिवसाला त्या केक घरी बनवतात. त्यांना प्रत्येक प्रकारची बिर्याणी बनवता येते जशी हैदराबादी बिर्याणी, कश्मिरी बिर्याणी, अंडा बिर्याणी. आजकाल कामाच्या व्यापामुळे जास्त स्वयंपाक करायला मिळत नाही मग ते त्यांच्या बहिणीची मदत घेतात.

परिवारासह हॉटेलमध्ये जायला भारती यांना फार आवडते. प्रत्येक हॉटेलची स्पेशलिटी त्यांना ट्राय करायला आवडते. दादर, वरळी, चेंबूर आणि अशा बरेच जागा आहेत. जिकडच्या हॉटेलचं जेवण त्यांना ऑथेंटिक वाटते. साऊथ इंडियन डिशेसमध्ये प्रत्येक प्रकारचा डोसा व वेगवेगळय़ा प्रकारचा उपमा त्यांना खूपच आवडतो.

 जॉइंट फॅमिली असल्यामुळे त्या स्वयंपाकात तर माहीर आहेतच. पुरणपोळी बनवण्यातही त्या तरबेज आहेत. एकदा त्यांच्या घरी काही समारंभ होता आणि त्यांनी एका

हॉटेलबद्दल ऐकलेले की, तिकडच्या पुरणपोळय़ा खूप मस्त असतात. तिथे जाऊन कळलं की, ते काही इतकं छान नव्हते. त्यामुळे सगळय़ांचा मूड खराब झाला. मग काय… भारती यांनी सगळय़ांना संध्याकाळी घरी जेवायला बोलावले. अगदी झटपट पुरणपोळय़ा केल्या. सगळे भारी खूश झाले आणि पोट भरून जेवले. त्यांची मोदक बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. ते रव्याच्या पिठाचे मोदक बनवतात.

 भारती सांगतात, भरपूर प्रमाणात दही किंवा ताक प्यायचे त्याने आरोग्य छान राहते. सॅलड खायचे. दुपारचे जेवण व्यवस्थित मग एक वेळ रात्री कमी खाल्लं किंवा नाही खाल्लं तरी पोटाला आराम मिळतो. उत्तम व्यायाम गरजेचे आहे. मग तुम्ही बारीक आहात किंवा जाड फरक पडत नाही. तुमचा पाय जोपर्यंत तुमचे वजन पेलवू शकतो तोपर्यंत तुम्ही फिट आहात. स्ट्रीट फूड खाणे त्या टाळतात. त्यापेक्षा तेच पदार्थ त्या घरी बनवतात. उत्तम चवीचे आणि स्वच्छतेने. खूप खा आणि निरोगी राहा, पण जे काही खाणार ते पचवादेखील.