25 वर्षे लोटली तरी ईबीसी शिष्यवृत्तीत वाढ नाही; राज्यातील 3200 विद्यार्थ्यांनाच मिळतो लाभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया गुणवत्ता शिष्यवृत्तीत गेल्या 25 वर्षांत वाढच झालेली नाही. शिष्यवृत्तीचे दर आणि लाभ मिळणाऱया विद्यार्थ्यांची संख्या जैसे थेच आहे. राज्यातल्या केवळ 3200 विद्यार्थ्यांनाच 80 ते 160 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.

कॉप्स विद्यार्थी संघटनेने शिष्यवृत्तीचा लाभ मिळणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याची मागणी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे. संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 1996 च्या शासन निर्णयानुसार ही शिष्यवृत्ती दिली जाते, मात्र 25 वर्षे लोटूनही शिष्यवृत्ती मिळणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत तसेच शिष्यवृत्तीच्या दरात वाढ झालेली नाही. आज 25 वर्षांनंतर या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे, मात्र बहुसंख्य पात्र विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. शिष्यवृत्ती संचात वाढ करून सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ द्यावा अशी मागणी एकाड यांनी केली आहे.

  • शासन निर्णयानुसार वसतिगृहात राहणाऱया विद्यार्थ्यांना दरमहा 140 रुपये व विद्यार्थिनींना दरमहा 160 रुपये मिळतात. z वसतिगृहात न राहणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना अनुक्रमे 80 व 100 रुपये मिळतात.
  • या सर्व शिष्यवृत्ती दरामध्ये महागाई निर्देशांकानुसार वाढ करून कमीत कमी 1 हजार रुपये दरमहा शिष्यवृत्ती करण्याची मागणी पुढे आली आहे.