निवडणूक आयोगाची पंतप्रधान कार्यालयाशी बैठक, … तर निवडणुका निष्पक्ष कशा होतील?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पंतप्रधान कार्यालय यांच्यात गुरुवारी ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीवरून कॉँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. निवडणूक आयोगाची पंतप्रधान कार्यालयाशी बैठक होणार असेल तर निवडणुका निष्पक्ष कशा होतील, असा सवाल खरगे यांनी केला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि दोन निवडणूक आयुक्त राजीव कुमार, अनुप चंद्र पांडे यांची पंतप्रधान कार्यालया सोबत ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीस कॉँग्रेस नेते खरगे यांनी तीव्र आक्षेप घेत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोग स्वतंत्र असला पाहिजे, ती स्वतंत्र संस्था आहे, पंतप्रधान कार्यालयासोबत त्यांच्या बैठका होणार असतील तर निवडणुका निष्पक्ष होतील आणि अशी अपेक्षा तरी कशी करायची, असा सवाल त्यांनी केला आहे. सीपीएमचे राज्यसभा खासदार जॉन ब्रिटास, सीपीएम नेते सीताराम येचुरी यांनीही याप्रकरणी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे.

बैठकीसाठी कायदे मंत्रालयाकडून पत्र

कायदे मंत्रालयाकडून निवडणूक आयोगाला या बैठकीसाठी पत्र पाठविण्यात आले होते. ज्यामध्ये काही असामान्य शब्द कापरण्यात आले होते. ज्यामध्ये असे म्हटले आहे की पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा एक बैठक घेणार आहेत ज्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांची देखील उपस्थिती आकश्यक आहे. या पत्रामध्ये एखाद्याला समन्स पाठवल्यासारखी भाषेचा वापर करण्यात आला होता. यापूर्वीही अशा दोन बैठका झाल्या होत्या.