
यंदाच्या दिवाळीत इको फ्रेंडली फटाके वाजणार आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाने ठरावीक वेळेतच फटाके वाजवणे बंधनकारक केले आहे. यावर केंद्र सरकारने उपाय शोधला असून तीस टक्के प्रदूषण कमी होईल असे फटाके बाजारात आणले जाणार आहेत. हिंदुस्थानी संशोधकांनी तयार केलेले फटाके बाजारातील फटाक्यांपेक्षा खूपच स्वस्त असतील असा दावा केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी केला. या फटाक्यांतील दारूगोळ्यात बदल केल्याने त्याची किंमत कमी असेल, असे कौन्सिल फॉर सायंटिफिक ऍण्ड इंडस्ट्रियल रिसर्चच्या प्रमुख साधना रायलू यांनी सांगितले.




























































