पंतप्रधान मोदींचे आर्थिक सल्लागार सुरजीत भल्लांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आर्थिक सल्लागार सुरजीत भल्ला यांनी राजीनामा दिला आहे. ”एएनआय” या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे याच वर्ष जून महिन्यात मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला होता. अरविंद सुब्रमण्यन यांनी कौटुंबिक जबाबदारीसाठी अमेरिकेला जाणार आहे असे सांगत राजीनामा दिला होता.

सोमवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. रिझर्व्ह बँकेच्या कारभारात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट होत आहे. वैयक्तिक कारणामुळे गव्हर्नर पदावरून दूर होत आहे, असे उर्जित पटेल यांनी राजीनाम्यानंतर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मोदी सरकारला जबर झटका, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा