ईडीकडून नागपूरच्या इप्रेस मॉलवर कारवाई; 483 कोटींची संपत्ती जप्त

56

सामना ऑनलाईन । मुंबई

अंमलबजावणी संचालनालयाने नागपूरच्या केएसएल ऍण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची मालकी असलेल्या इम्प्रेस मॉलवर छापा टाकत सुमारे 483 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील तायल ग्रुप ऑफ कंपनीच्या मालकीची ही कंपनी असून बँकेची फसवणुक केल्याप्रकरणी या कंपनीवर ईडीने कारवाई केली.

या कारवाईदरम्यान. ’ईडी’ने नागपूरमधील 483 कोटी रुपयांचा तसेच दोन लाख 70 हजार 374 चौरस फुटांचा शॉपिंग मॉलच जप्त केला. दरम्यान, ’सीबीआय’ने तायल समूहाच्या तीन कंपन्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दाखल घेत ’ईडी’ने ही कारवाई सुरू केली.  ऍक्टिफ कॉर्पोरेशन लि., जयभारत टेक्सटाइल्स अँड रीयल इस्टेट लि, व एस्के नीट (इंडिया) लि अशी या कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्यांनी 2008 मध्ये बँक ऑफ इंडिया व आंध्र बँकेकडून 524 कोटींची कर्जे घेऊन बँकेची फसवणूक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या