अनिल अंबानींच्या कंपन्यांवर दुसऱ्या दिवशीही ईडीची कारवाई सुरूच

उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) छापे आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहेत. 3000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात येत आहे. ईडीने अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपच्या 40 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत सुमारे 50 कंपन्या आणि 25 हून अधिक जणांची चौकशी करण्यात आलेली आहे.

अनिल अंबानी समूहावर ईडीची कारवाई, 3 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी 50 ठिकाणी छापे

(24 जुलै) ईडीच्या पथकाने देशभरातील उद्योगपती अनिल अंबानी यांच्याशी संबंधित 50 ठिकाणी कारवाई केली होती. ही कारवाई कालपासून सुरू झाली होती आणि आजही सुरू आहे. ईडीचे पथक आजही अनिल अंबानींच्या अनेक ठिकाणी छापे टाकत आहे.

हे संपूर्ण प्रकरण 3000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधित आहे. देशभरात 50 ठिकाणी ईडीच्या पथकाने काल कारवाई केली. आजही उद्योगपती अनिल अंबानींच्या अनेक ठिकाणी ईडीची कारवाई सुरू आहे.