
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सीबीआयनंतर अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) एअर एशियाच्या अधिकाऱयांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण परवाने मिळवण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप या अधिकाऱयांवर ठेवण्यात आला आहे. अशा परवान्यांसाठी आवश्यक निकष या कंपनीने पूर्ण केले नव्हते असे चौकशीत आढळून आले.
एअर एशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी फर्नांडिस यांनी सरकारी अधिकाऱयांशी संगनमत करून हे परवाने मिळवले. त्याबद्दल त्यांच्या विरोधात सीबीआयने नुकताच गुन्हा नोंदवला आहे. या परवान्यांसाठी कंपनीने एका केंद्रीय मंत्र्याला ५० लाख डॉलर्स इतकी लाचही दिल्याचे उघड झाले आहे. आता या प्रकरणातील आरोपींनी बेकायदा संपत्ती जमा केली आहे का याचाही शोध घेतला जाणार आहे.




























































