
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची आज ‘ईडी’ने चौकशी केली आहे. परकीय चलन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याचा गोयल यांच्यावर आरोप आहे. काही दिवसांपूर्वी नरेश गोयल यांच्या मुंबई येथील निवासस्थानी, त्यांच्या कंपन्यांच्या कार्यालयावर, कंपन्यांचे संचालक, जेट एअरवेजचे कार्यालय येथे ‘ईडी’ने छापे टाकले होते. गोयल यांच्या मालकीच्या 19 कंपन्या आहेत. यातील पाच कंपन्यांची नोंदणी परदेशात झाली आहे. कंपन्यांचा दररोजचा खर्च, तसेच विक्री आणि वितरणाचे व्यवहार संशयास्पद आहेत. खर्चाची आकडेवारी फुगवून सांगितली आणि कंपन्या तोट्यात चालवित असल्याचे दाखविले असल्याचे ‘ईडी’च्या सूत्रांचे म्हणणे आहे.



























































