रॉबर्ट वढेरा यांची 4 कोटी 62 लाखांची मालमत्ता जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
robert-vadra

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

काँगेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांचे पती रॉबर्ट वढेरा यांची 4 कोटी 62 लाखांची मालमत्ता बिकानेर येथील भूखंड खरेदी घोटाळ्याच्या प्रकरणात जप्त करण्यात आली आहे. ही माहिती अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणजे ‘ईडी’च्या अधिकाऱयांनी आज दिली. ती मालमत्ता वढेरा यांच्या कंपनीची आहे.

बिकानेर येथील भूखंड खरेदी घोटाळ्याच्या प्रकरणात ‘ईडी’ने 2015 सालात गुन्हा दाखल केला होता. यासंदर्भात बिकानेरच्या तहसीलदारांनी तक्रार दाखल केली होती. राजस्थानातील हिंदुस्थान-पाकिस्तानच्या सीमेनजीक असलेल्या भूखंडाच्या वाटपात बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप होता. रॉबर्ट वढेरा हे गुरुवारी जयपूर येथील ‘ईडी’च्या कार्यालयात आई मौरीन हिच्यासहीत हजर झाले होते. त्यावेळी प्रियंका गांधीही त्यांच्यासोबत होत्या.