इजिप्तमध्ये सापडले 4500 वर्षे जुने सूर्यमंदिर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इजिप्तच्या अबू गोराबच्या वाळवंटात 4500 वर्षे जुने सूर्यमंदिर सापडले आहे. प्राचीन इजिप्शियन राजा फारोच्या सहा हरवलेल्या सूर्यमंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. त्यातील एक मंदिर आधीच सापडलेले होते.

इजिप्तशास्त्रज्ञ डॉ. मॅसिमिलियानो नुझोलो म्हणतात. मंदिराच्या दगडाखाली एक मोठे प्रवेशद्वार आहे, जे दुसरी इमारत अस्तित्वात असल्याचे सूचित करते. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी तेथून ढिगारा काढला तेव्हा चुनखडीचे खांब सापडले.

सूर्यमंदिर मातीच्या विटांनी बांधले होते. मंदिर खूप प्रेक्षणीय असावे, असे जाणकारांचे मत आहे. त्यासाठी अबू गोराबमध्ये सापडलेल्या अवशेषांच्या सहाय्याने त्यांनी संगणकावर मंदिराची रचना केली. याशिवाय पुरातत्त्वशास्त्रज्ञांना प्राचीन जागेवर मातीचा जार सापडला. ज्यामध्ये माती भरलेली होती. या भांडय़ामध्ये पूजेच्या वेळी सूर्यदेवाला नैवेद्य दाखवला जात असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.