धारावीत 8 लाखांची बेहिशेबी रक्कम जप्त

905

मुंबईसह राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर  निवडणूक आयोगाने पैशाच्या व्यवहारावर लक्ष केंद्रित केले असून त्या अंतर्गत काल सकाळी धारावीतून 8 लाख 17 हजार रुपयांची बेहिशेबी रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या पथकाने सकाळी दहा   वाजता सायन जंक्शन जवळ वाहन क्र. एमएच 04 एचएक्स 1916 या  पांढर्‍या रंगाच्या हुंडाई क्रेटा या वाहनाची तपासणी केला असता धीरेन कांतीलाल छेडा वय (42) यांच्याकडे ही रक्कम आढळली. छेडा हे घाटकोपरमध्ये राहतात. त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे. त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्यास त्यांच्या विरोधात नियमानुसार आयकर खात्यामार्फत कारवाई होईल. .या प्रकरणी धारावी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र हजारे यांनी दिली.

राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर बेहिशेबी रक्कम, दारु तसेच बँक खात्यातील मोठया व्यवहारावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. बँकेतून मोठी रक्कम काढल्यास अथवा मोठी रक्कम जमा केल्यास चौकशी होऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या