नोबेलविजेत्या शास्त्रज्ञाने हिंदुस्थानींची अक्कल काढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । न्यू यॉर्क

हिंदुस्थानी हे इतर जगातील लोकांच्या तुलनेत कमी बुद्धिमान असतात, असं निरीक्षण जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी नोंदवलं आहे. त्यांनी हे निरीक्षण त्यांच्या डायरीत नोंदवलं असून ती डायरी समोर आल्याने आता खळबळ माजली आहे. या नोंदीमुळे आईनस्टाईन यांच्यावर वंशवादी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आईनस्टाईन ऑक्टोबर १९२२ ते मार्च १९२३ दरम्यान हिंदुस्थान दौऱ्यावर होते. त्यांनी त्यावेळी त्यांच्या अनुभवावरून आपलं निरीक्षण नोंदवलं आहे. आनुवंशिकरित्या हिंदुस्थानी हे कमी बुद्धिमान असतात, असं आईनस्टाईनचं म्हणणं आहे. फक्त हिंदुस्थानच नाही, तर श्रीलंका आणि चीनचे नागरिकही कमी बुद्धिमान असल्याचं आईनस्टाईनचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हिंदुस्थान आणि त्याच्या शेजारील देशांच्या हवामानामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेत फरक पडतो.

आईनस्टाईन यांच्या वैयक्तिक डायरीत या नोंदी केल्या असून त्यामुळे त्यांच्यावर वंशवादी असल्याची टीका होत आहे. आईनस्टाईन यांच्यावर पुस्तक लिहिणाऱ्या रॉजेनक्रँज यांच्या म्हणण्यानुसार, हिंदुस्थानी हे इतिहास, अध्यात्म, वैदिक अध्ययन या सगळ्यांमध्ये अग्रेसर होते. त्याशिवाय नंतरच्या काळातील वैज्ञानिक जगतातही हिंदुस्थानींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तरीही आईनस्टाईन यांचं असं निरीक्षण हे वंशवादाच्या दिशेने बोट दाखवणारं आहे.