पहिल्या यादीत खडसेंचे नाव नाही, तरीही भरला उमेदवारी अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपने मंगळवारी महाराष्ट्रातील 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत दिसत नाहीये. त्यांचे नाव या यादीत दिसत नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एकनाथ खडसे यांना यावेळी संधी मिळणार की नाही अशी चर्चा सुरु असतानाच खडसे यांनी उमेदवारी अर्ज भरून टाकला. ‘आज मुहुर्त असल्याने मी अर्ज भरला आहे. आणखी एक यादी येण्याची शक्यता आहे असं स्पष्टीकरण खडसे यांनी दिलं आहे.’  त्यांच्या या विधानामुळे भाजपकडून मुक्ताईनगर मतदारसंघात उमेदवारी मिळण्याच्या खडसे यांच्या आशा अजूनही जिवंत असल्याचं जाणवतं आहे. एकनाथ खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली ते पाहा.