नाराज एकनाथ खडसे म्हणाले, भाजपमध्येच राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
eknath-khadse

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पाडापाडीच्या राजकारणामुळे एकनाथ खडसे भाजपमध्ये कमालीचे नाराज आहेत. गोपीनाथ गडावरील मेळाव्यात बोलताना खडसे यांनी स्वतःच भाजप सोडण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात असताना एकनाथ खडसे यांनी मी पक्षातून बाहेर पडणार नाही, तर भाजपमध्येच राहणार असल्याचे बुधवारी नागपूर येथे बोलताना स्पष्ट केले.

भाजपमधील पक्षांतर्गत राजकारणामुळे नाराज असणाऱया एकनाथ खडसे यांनी अलीकडेच दिल्लीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतल्याने ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार नागपूर दौऱ्यावर असतानाच खडसेदेखील मंगळवारी नागपूरमध्ये दाखल झाल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.