
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-काँग्रेस आघाडीवरून आकांडतांडव करणाऱया कमळाबाईने अंबरनाथमध्ये सत्तेच्या सारीपाटासाठी थेट काँग्रेसलाच ‘डोळा’ मारला आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीनंतर सत्तेचे गणित जुळवून आणण्यासाठी भाजपने शिंदे गटाला धक्का देत काँग्रेसबरोबर ‘हात’मिळवणी करून युती केली आहे. काँग्रेसच्या जोरावर अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजप बहुमताचा आकडा गाठणार आहे. त्यामुळे भाजपच्या हिंदुत्वाच्या नौटंकीचा बुरखा फाटला आहे.
अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजपच्या तेजश्री करंजुले या नगराध्यक्षा म्हणून विजयी झाल्या आहेत. तसेच 16 नगरसेवकदेखील कमळ चिन्हावर निवडून आले आहेत. मात्र नगर परिषदेवर एकहाती सत्ता गाजविण्यासाठी भाजपने काँग्रेसचे 12, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 अशा एकूण 32 नगरसेवकांची मोट बांधली आहे. अंबरनाथमध्ये शिंदे गटाचा 23 जागांवर विजय झाला आहे. राज्यात मांडीला मांडी लावून बसलेल्या भाजपने अंबरनाथमध्ये मात्र शिंदे गटाला खडय़ासारखे बाजूला सारत चक्क काँग्रेसबरोबर युती केली. या युतीमध्ये त्यांनी अजित पवार गटालाही सामील करून घेतले आणि शिंदे गटाला धक्का दिला आहे.
…तर शिंदे गटाबरोबरची युती अभद्र ठरली असती
काँग्रेसबरोबर हातमिळवणी केल्यानंतर शिंदे गटाचा चांगलाच तिळपापड झाला आहे. भाजप आणि काँग्रेसची युती अभद्र असल्याची टीका शिंदे गटाने केली आहे, तर याला भाजपचे उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे गटाला सोबत घेऊन सत्तेत बसलो असतो तर ती अभद्र युती ठरली असती. निवडणुकीत आम्ही अनेकदा युतीसाठी प्रयत्न केला. मात्र शिंदेंच्या नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांना आता थयथयाट करायचा तर करू द्या, असे सांगत करंजुले यांनी शिंदे गटाच्या आरोपांना पिंमत देत नसल्याचे दाखवून दिले.
स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांचा जन्मदिवस म्हणजेच ममता दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी मंगळवारी शिवतीर्थ येथील सौ. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, उपनेते विजय कदम, शिवसेना सचिव अॅड. साईनाथ दुर्गे, विभागप्रमुख–आमदार महेश सावंत, मनसे मुंबई उपशहराध्यक्ष यशवंत किल्लेदार, निशिकांत शिंदे, ज्योती भोसले तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.



























































