
एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांनी शिवसेना सोडताना 50 कोटी रुपये घेतले होता असा आरोप झाला होता. आताय आरोपाला पुष्टी मिळणारे एक विधान समोर आले आहे. संतोष बांगर यांनी मिंधे गटात जाण्यासाठी 50 कोटी रुपये घेतला असा दावा भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला आहे. तसेच 50 खोके एकदम ओके ही घटना सत्य आहे असेही मुटकुळे म्हणाले.
साम टीव्ही या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना मुटकुळे म्हणाले की मिंधे गटात सामील होण्यासाठी बांगर यांनी 50 कोटी रुपये घेतले होते ही बाब खरी आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. मुटकुळे म्हणाले की, आदल्या दिवशी बांगर रडत होते आणि आवाहन करत होते की मिंधे गटात जाऊ नका. पण त्यांना 50 कोटी रुपये मिळाले आणि दुसऱ्या दिवशी ते मिंधे गटात सामील झाले. एकनाथ शिंदे यांनीच बांगर यांना 50 कोटी रुपये दिले असावे अशी शक्यताही मुटकुळे यांनी व्यक्त केली.



























































