
महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. अर्ज भरण्याचे अवघे काही दिवस बाकी असताना निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी उमेदवारांच्या खर्चासाठी खानपानचे दर जाहीर केले आहेत. त्यात शाकाहरी जेवण 115 ते 180 रुपये, मटण प्लेट 240, तर बिर्याणीची प्लेट 150 रुपयांना निश्चित केली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खर्चाचे दर वाढल्याने उमेदवारांच्या खर्चाचे नियोजन कोलमडणार आहे. महापालिका निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे महापालिका प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. 30 डिसेंबर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना खर्चाची मर्यादेसह दरपत्रक निश्चित करून देण्यात आले आहे.





























































