आयोगाने आमची बाजू न ऐकताच राष्ट्रवादीत फूट पडल्याचे जाहीर केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय निवडणूक आयोगाने आमची बाजू न ऐकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे जाहीर केले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी केली. राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडली नसल्याचे आम्ही निवडणूक आयोगाला कळवले होते, पण आयोगाने आमचे म्हणणे न ऐकता फूट पडल्याचे जाहीर केले. याविषयी आम्ही वकिलांचा कायदेशीर सल्ला घेत आहोत, असे जयंत पाटील म्हणाले.