निवडणूक आयोगाने जारी केले नवीन व्होटर आयडी, डुप्लिकेट ओळखपत्राचा प्रश्न सोडवल्याचा दावा

डुप्लिकेट मतदार ओळखपत्रांचा प्रश्न तीन महिन्यांत सोडवल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. एकसारखा मतदार ओळखपत्र क्रमांक असणाऱयांना नवीन मतदार ओळखपत्रे जारी करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

डुप्लिकेट मतदार ओळखपत्र क्रमांकाचा मुद्दा गेल्या 20 वर्षांपासून प्रलंबित होता. मतदार ओळखपत्रे चुकीच्या पद्धतीने जारी करण्यात आली होती. यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. ही समस्या सोडवण्यासाठी देशभरातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील मुख्य निवडणूक अधिकारी आणि 4,123 विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक नोंदणी अधिकाऱयांनी सुमारे साडेदहा लाख मतदार पेंद्रांवरील 99 कोटींहून अधिक मतदारांची संपूर्ण माहिती तपासल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे.