
वीज ग्राहकाने नोव्हेंबर 2020 या महिन्याचे वीजदेयक तत्काळ पूर्ण भरल्यास त्यास सूट देण्यात येऊन ती पुढील बिलामध्ये क्रेडिट समाविष्ट केली जाईल असे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे. तसेच माहे, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2020 करिता झालेला वीजवापरावर विलंब प्रदान आकार आणि वीजदेयकाच्या थकबाकीवरील व्याज माफ करण्यात येणार आहे.
एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2020 या महिन्यांकरिताच्या वीज वापराच्या देयकामध्ये 2 टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांना वीज बिल तीन हप्त्यांत भरण्याचाही पर्याय देण्यात आला आहे. नोव्हेंबर 2020 चे देयक तीन हप्त्यांमध्ये विभागून नोव्हेंबर 2020, डिसेंबर 2020 आणि जानेवारी 2021 या महिन्यांत पैसे भरल्यास ग्राहकांना खालीलप्रमाणे सूट देण्यात येणार आहे. माहे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2020 करिता झालेल्या वीज वापरावर पेमेंट उशीर झाल्याचा दंड आणि थकबाकीवरील व्याज माफ करण्यात येणार आहे. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2020 या महिन्यामध्ये झालेल्या वीज वापराच्या बिलावर एक टक्का सूट देण्यात येणार आहे. तीनही हप्ते वेळेवर भरल्यास इंटरेस्ट ऑफ एरिअर्स आकारण्यात येणार नाही.
ज्या वीज ग्राहकांनी वीजदेयक भरले आहे त्यांना एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2020 या महिन्याकरिता उशीर झाल्याचा दंड आणि थकबाकीवरील व्याज लागले असल्यास तो माफ करण्यात येईल व ज्यांनी वेळेत बिले भरलेली आहेत त्यांना 2 टक्के इतकी तत्काळ सूट देण्यात येणार आहे.



























































