
मे महिन्यात एकूण गाडय़ांची विक्री 25 लाख 31 हजार 67 इतकी झाली असून यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची विक्री पहिल्यांदाच 11 टक्क्यांच्या पुढे गेली आहे.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन्स (फाडा) ने दिलेल्या माहितीनुसार, मे 2026 मध्ये देशातील एकूण ऑटो रिटेल विक्री 9.55 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात एकूण गाडय़ांची विक्री ही 23 लाख 10 हजार 451 झाली होती. आता ती 25 लाखांच्या पुढे गेली आहे. इंधनाचे दर वाढल्याने ग्राहक आता जास्त मायलेज देणाऱया व ईव्ही आणि हायब्रिड वाहनांबद्दल डीलरकडे चौकशी करत आहेत.





























































