वीज कामगारांचा संपाचा इशारा

456

महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये सुमारे एक लाख कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना पेन्शन योजना लागू करा, रिक्त असलेल्या तब्बल 40 हजार पदांची तत्काळ भरती करा, वीज कंपन्यांमधील कंत्राटी, आऊटसोर्सिंग पद्धत बंद करा, मृत्यू झालेल्या वीज कामगारांच्या वारसाला नोकरी द्या आदी मागण्यांबाबत व्यवस्थापनाने सकारात्मक निर्णय घेऊन 15 जूनपर्यंत अंमलबजावणी करावी, अन्यथा राज्यभरातील वीज कामगार 17 जूनच्या मध्यरात्रीपासून 24 तासांचा लाक्षणिक संप करतील असा इशारा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक वर्कर्स फेडरेशनने दिला आहे. तसेच व्यवस्थापन वीज कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या