
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंगा घेणे टेस्लाचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांना चांगलेच महागात पडले आहे. मस्क यांच्या संपत्तीत कमालीची घसरण होत असून त्यांना अवघ्या 24 तासांत 12083 कोटींचा आर्थिक फटका बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेल्या नव्या धोरणाचा विरोध केल्यामुळे ट्रम्प यांचे चांगले दिवस फिरले आहेत. मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर राग काढण्यासाठी नवीन राजकीय पक्षाचीसुद्धा घोषणा केली आहे. टेस्लाचे शेअर्स 7 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. गेल्या सहा महिन्यांत टेस्लाच्या शेअर्समध्ये 26 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग रियल टाइम बिलियनर्सच्या माहितीनुसार, मस्क यांची संपत्ती आता 346 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली आहे.