
अमेरिकेचे उद्योगपती एलॉन मस्क यांचे वडील एरोल हे पुढील महिन्यात हिंदुस्थान दौऱ्यावर येणार आहेत. एरॉल मस्क यांचा हिंदुस्थान दौरा 1 जूनपासून सुरू होणार आहे. 6 जूनला ते हिंदुस्थानातून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहेत. 1 जूनला एरोल मस्क हे दिल्लीत दाखल होतील. 2 जून रोजी गुंतवणूकदार आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे. या दौऱ्यात ते हरयाणातील सफियाबादलाही भेट देणार आहेत. तसेच अयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.