ब्रिटीशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडून त्याजागी नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर हा उड्डाणपूल बांधला जाणार आहे. एमएमआरडीए हे काम करणार आहे. या प्रकल्पात 19 इमारती बाधित होणार आहेत. या इमारतींमधील रहिवाशांची पुनर्विकासाची मागणी आहे. पाडकामाला स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. यामुळे दोन वेळा पाडकाम पुढे ढकलावे लागले होते. मात्र, 11 सप्टेंबरला पाडकामाबाबत आदेश काढण्यात आला. आणि लगेचच पाडकामाला सुरुवात करण्यात आली.