
कोरोनामुळे नाइलाजास्तव गेल्या दीड वर्षापासून सगळ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करावं लागतंय. सुरुवातीला अनेकांना घरून काम करण्याचा कंटाळा आला; परंतु आता कर्मचाऱयांना ‘वर्क फ्रॉम होम’ आवडू लागल्याचं दिसतंय. ज्या कंपन्या कामगारांना पुन्हा बोलावतायत तिथले कर्मचारी ऑफिसला जाण्याऐवजी ‘वर्कफ्रॉम होम द्या, नाहीतर राजीनामा देतो’, अशी भूमिका घेताना दिसतायत. ‘फ्लेक्स जॉब’ या कंपनीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे ज्या कंपन्या वर्प फ्रॉम होम देतायत अशा कंपन्यांचा शोध सध्या कर्मचारी घेताना दिसतायत.
फ्लेक्स जॉब या कंपनीने एप्रिल महिन्यात हे सर्वेक्षण केले होते. जगभरातील तब्बल 2100 कर्मचाऱयांवर केलेल्या सर्वेक्षणात निम्म्याहून अधिक कर्मचाऱयांनी वर्क फ्रॉम होमला पसंती दिली. सोबतच यापुढेही घरातूनच काम करायला मिळावे, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. घरातूनच काम केल्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचतो, असे अनेकांनी म्हटले आहे.
70 टक्के कंपन्या सकारात्मक
फोरेस्टर या ग्लेबल रिसर्च फर्मनुसार यूएस आणि युरोपमधील 70 टक्के मल्टिनॅशनल कंपन्या वर्प फ्रॉम होम कल्चर स्वीकारण्याच्या दृष्टीने अनुपूल आहेत. तर गुगल, फोर्डसारख्या काही कंपन्या हायब्रीड वर्क मॉडेलच्या समर्थनात आहेत.































































