फारुख अब्दुल्ला यांना ईडीचे पुन्हा समन्स, मंगळवारी चौकशीला बोलावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. एका मनी लाँड्रिंग प्रकरणात अब्दुल्ला यांना मंगळवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

कश्मीर क्रिकेट संघटनेतील कथित आर्थिक घोटाळय़ाप्रकरणी गेल्या महिन्यात ईडीने फारुक अब्दुल्ला यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र ते हजर ना राहिल्याने त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे. हे प्रकरण 2022 चे असून त्या वेळी या प्रकरणात ईडीने अब्दुल्ला यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

कश्मीर क्रिकेट संघटनेतील कथित आर्थिक घोटाळय़ात मनी लॉण्डरिंग झाले आहे असा दावा ईडीने 2022 मध्ये केला होता. त्यानंतर जून महिन्यात फारुख अब्दुल्ला यांची चौकशी देखील झाली होती.