लाच घेताना अभियंता ट्रॅप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

फ्लॅटमध्ये केलेले नूतनीकरणाचे काम अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत पालिकेने बजावलेल्या नोटिसीनुसार कारवाई होऊ द्यायची नसल्यास आठ लाख रुपये दे अशी मागणी करून त्यापैकी दोन लाख रुपयांचा दुसरा हप्ता घेताना पालिकेच्या इमारत व बांधकाम विभागाचा अभियंता किरण पाटील हा रंगेहाथ ट्रॅप झाला. जोगेश्वरी येथे राहणार्‍या अभिषेक (नाव बदललेले) याने त्यांच्या फ्लॅटमध्ये नूतनीकरणाचे काम केले होते. ते काम अनधिकृत असल्याबाबत पालिकेच्या के/पश्चिम वॉर्डने त्यांना नोटीस बजावली होती. त्या नोटिसीच्या अनुषंगाने चौकशीसाठी अभिषेक हे त्या वॉर्डमध्ये गेले असता किरण पाटील या दुय्यम अभियंत्याने त्यांना नोटिसीप्रमाणे कारवाई होऊ द्यायची नसल्यास आठ लाख रुपये दे अशी मागणी केली होती.