
कर्नाटकातील बेंगळुरू येथील आगरा तलावात दोन आठवड्यांपूर्वी एका एआय फर्ममधील 25 वर्षीय मशीन लर्निंग इंजिनिअरचा मृतदेह आढळला. आॅफिस पाॅलिटिक्सला कंटाळून या इंजिनिअरने आत्महत्या केली असे आता समोर आले आहे. हा आरोप फर्मच्या एका कर्मचाऱ्याने केला आहे. 8 मे रोजी इंजिनियर निखिल सोमवंशी याचा मृतदेह तलावात आढळला आणि या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आणि तपास सुरू करण्यात आला.
निखिल सोमवंशी यांनी बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) येथून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली होती. त्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, तो राइड-हेलिंग अॅप ओलाच्या एआय कंपनीमध्ये मशीन लर्निंग इंजिनिअर म्हणून रुजू झाला. सोमवंशी खूप हुशार विद्यार्थी होता, शिवाय त्याचे प्लेसमेंट देखील लगेचच झाले होते. परंतु त्याच्यावर असलेल्या कामाच्या तणावामुळे त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
कंपनीचे अमेरिकास्थित राजकिरण पानुगंती यांच्याबाबत, एका व्यक्तीने आरोप केला की, पानुगंती दररोज नवीन कर्मचाऱ्यांसोबत आक्षेपार्ह भाषेचा वापर करत असत. त्यामुळे ऑफिसमधील वातावरण बिघडले होते. यामुळेच अनेक टीम मेंबर्सने राजीनामा दिला होता. कंपनीने ईमेलद्वारे सांगितले की त्याने, 8 एप्रिल रोजी त्याच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला आणि त्याला विश्रांतीची आवश्यकता असल्याचे सांगितले आणि त्याला ताबडतोब रजा मंजूर करण्यात आली. नंतर 17 एप्रिल रोजी तो ऑफिसमध्ये आला. पण त्याची तब्येत अजूनही ठीक नव्हती. त्यामुळे त्याची रजाही वाढविण्यात आली. कर्मचाऱ्याने आरोप केला आहे. त्यांनी असेही म्हटले की, अभियंत्याच्या मृत्यूची माहिती दिल्यानंतरही अधिकारी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत राहिला.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, व्यवस्थापकाची प्रतिमा बऱ्याच काळापासून अशीच आहे. तो अनेकदा कनिष्ठ कर्मचाऱ्यांना तुच्छ लेखायचा आणि त्यांना निरुपयोगी ठरवायचा. अहवालानुसार माजी कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यावरील आरोपांना दुजोरा दिला आणि दावा केला की, कामाच्या दबावामुळे त्यानेही दुसरी नोकरी मिळण्यापूर्वीच राजीनामा दिला होता.