यापुढे इंजिनीयरिंग आणि मेडिकलचीच सीईटी, ‘पीसीएमबी’ ही एकत्रित सीईटी रद्द

1629

इंजिनीयरिंगला जायचे की मेडिकलला या गोंधळात असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत या दोन्ही अभ्यासक्रमासाठी मिळून ‘पीसीएमबी’ ही एकच सीईटी देता येत होती. पण वर्ष 2020 पासून प्रवेश नियामक प्राधिकरणाने ‘पीसीएमबी’ सीईटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे इंजिनीयरिंगसाठी ‘पीसीएम’ आणि मेडिकलसाठी ‘पीसीबी’ या दोन वेगवेगळ्या सीईटी होणार आहेत. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र्ा, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी सीईटी घेतली जाते. गेल्या वर्षीपर्यंत इंजिनीयरिंग आणि मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी पीसीएमबी (भौतिकशास्त्र्ा, रसायनशास्त्र्ा, गणित आणि जीवशास्त्र्ा) अशा विषयांची एकच परीक्षा घेतली जात होती, मात्र यापुढे पीसीएमबी सीईटी न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी याची दखल घेत आतापासूनच अभ्यासाचे नियोजन करावे, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

– सीईटी परीक्षा देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे.
– 13 ते 17 एप्रिलदरम्यान आणि 20 ते 23 एप्रिलदरम्यान दोन्ही गटानुसार परीक्षा घेतल्या जातील.
– पीसीबी आणि पीसीएम यापैकी कोणत्या गटाच्या परीक्षा आधी होतील याचा निर्णय विद्यार्थी संख्येनुसार घेण्यात येणार आहे.

…तर दोन सीईटी द्याव्या लागणार
आतापर्यंत इंजिनीयरिंगसाठी ‘पीसीएम’, मेडिकलसाठी ‘पीसीबी’ तसेच दोन्ही अभ्यासक्रमांसाठी मिळून ‘पीसीएमबी’ अशा तीन सीईटी घेण्यात येत होत्या, पण एप्रिल 2020 पासून ‘पीसीएम’ आणि ‘पीसीबी’ या दोनच सीईटी घेण्यात येणार आहेत. इंजिनीयरिंग किंवा मेडिकलपैकी कोणत्याही एका अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांना स्वतःचा कल तपासण्यासाठी या दोन्ही सीईटी द्याव्या लागणार आहेत.

परीक्षा खर्च दुपटीने वाढला
‘पीसीएमबी’ या एकत्रित ग्रुपचा पर्याय बंद विद्यार्थ्यांचा परीक्षा खर्चही दुपटीने वाढला आहे. एका सीईटीसाठी खुल्या प्रवर्गासाठी 800 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत होते. पण यापुढे इंजिनीयरिंग आणि मेडिकल या दोन्ही सीईटीला बसू इच्छिणाऱया विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांचे मिळून 1600 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. दोन्ही परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची फी सवलत दिली जाणार नाही, असेही सीईटी सेलने जाहीर केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या