क्रिकेटच्या पंढरीत यजमान इंग्लंड पराभूत, पाकिस्तानची मालिकेत १-० अशी आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

यजमान इंग्लंड संघाला क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्डस् येथे लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानने येथे झालेली पहिली कसोटी ९ गडी राखून जिंकली आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कसोटीत आठ बळी गारद करणाऱ्या मोहम्मद अब्बासची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव १८४ धावांमध्येच आटोपल्यानंतर पाकिस्तानने पहिल्या डावात ३६३ धावा तडकावल्या. त्यानंतर इंग्लंडला दुसऱ्या डावातही आपला ठसा उमटवता आला नाही. २४२ धावांमध्येच त्यांचा संघ गारद झाला. विजयासाठी आवश्यक असलेले ६४ धावांचे आव्हान पाकिस्तानने अवघा एक गडी गमावून पूर्ण केले. इमाम उल हकने नाबाद १८ धावांची तर हारीस सोहेलने नाबाद ३९ धावांची खेळी करीत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.