ब्रिटनमधील 18 महिला खासदारांचा निवडणुकीला रामराम

764

ब्रिटनमधील 18 महिला खासदारांनी पुढील महिन्यात होणाऱया निवडणुकीला रामराम ठोकला आहे. या महिलांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. या महिला खासदार गेल्या काही काळापासून संसदेतील गैरकारभार आणि धमक्यांनी हैराण झाल्या आहेत. त्यांना त्यांच्या खासगी आयुष्यातही टीका, धमक्यांना सामोरे जावे लागत असून याला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

सर्व खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील मतदारांना खुले पत्र लिहून खासदार पद सोडणार असल्याचे सांगितले आहे. येथील कंजर्वेटिव्ह पक्षाच्या खासदार हीदी एलन यांनी सांगितले, ‘खासदार झाल्यापासून खासगी आयुष्यात बाहेरच्या लोकांची ढवळाढवळ सुरू आहे. काही लोक कामात अडथळे आणत असून धमक्याही देत आहेत.’

आतापर्यंत ब्रिटनमध्ये सुमारे 50 खासदारांनी निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणातील महिलांची स्थिती पाहून विविध महिला संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या