जो रूटचा शतकी धमाका

कर्णधार जो रूटच्या नाबाद 168 धावांच्या जोरावर इंग्लंडच्या क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस गाजवला. इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेरीस 4 बाद 320 धावा केल्या असून आता त्यांचा संघ 185 धावांनी आघाडीवर आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे शुक्रवारी फक्त 53 षटकांचाच खेळ होऊ शकला. जो रूटने 18 वे कसोटी शतक झळकावले हे विशेष.

लसिथ इम्बुलदेनीयाने जॉनी बेअरस्टोला 47 धावांवर बाद केले. जो रूट व पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या डॅन लॉरेन्स या जोडीने 173 धावांची भागीदारी करताना इंग्लंडसाठी मोलाची कामगिरी बजावली. दिलरूवान परेराने डॅन लॉरेन्सला 73 धावांवर बाद करीत जोडी तोडली.

आपली प्रतिक्रिया द्या