वेस्ट इंडीज इतिहास रचणार? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीला आजपासून सुरुवात

716

पहिल्या कसोटीत पाहुण्या वेस्ट इंडीजने इंग्लंडला पराभवाचा धक्का देत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या कसोटीत बेन स्टोक्सच्या अष्टपैलू खेळाडूच्या जोरावर इंग्लंडने वेस्ट इंडीजला धूळ चारली आणि मालिका बरोबरीत आणली. आता दोन रोमहर्षक कसोटींनंतर उद्यापासून उभय संघांमध्ये तिसऱ्या कसोटीला सुरुवात होणार आहे. याप्रसंगी कसोटी मालिका विजयासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची शिकस्त करतील यात शंका नाही. मात्र वेस्ट इंडीज संघाकडे कसोटीसह मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी असणार आहे. दोन देशांमधील मागील मालिका वेस्ट इंडीजने जिंकली. त्यामुळे `विस्डेन’ ट्रॉफी त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे मालिका बरोबरीत राहिल्यानंतरही ट्रॉफी त्यांच्याकडेच असणार आहे. मात्र तिसरी कसोटी जिंकल्यास इंग्लंडमध्ये 1988 सालानंतर मालिका जिंकण्याचा करिष्मा जेसन होल्डरच्या वेस्ट इंडीज संघाला करता येणार आहे.

आजपासून तिसरी कसोटी

  • इंग्लंड – वेस्ट इंडीज, मँचेस्टर
  • सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी वाहिनीवर
  • दुपारी 3.30  वाजता
  • रोटेशन पद्धतीचा अवलंब

सध्या इंग्लंडच्या संघात रोटेशन पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे.  जोफ्रा आर्चर, मार्क वूड, खिस वोक्स या वेगवान गोलंदाजांसह स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अ‍ॅण्डरसन यांनाही अधूनमधून खेळवण्यात येत आहे. तसेच पहिल्या दोन कसोटींत आपला ठसा उमटवणार्या बेन स्टोक्सलाही विश्रांती देण्याची योजना सुरू आहे. मात्र ` जिंकू किंवा मरू’ अशा लढतीत इंग्लंडचे व्यवस्थापन रोटेशन पद्धतीचा अवलंब करतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

फलंदाजांना मोठी खेळी करावी लागणार

वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांनी या मालिकेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केलीय. शॅनोन गॅब्रियल, केमार रोच, अल्जारी जोसेफ व कर्णधार जेसन होल्डर यांनी आपली कामगिरी चोख बजावलीय. फिरकी गोलंदाज रहकीम कॉर्नवेल यालाही खेळपट्टी पाहून संघात संधी दिली जाऊ शकते. वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना या मालिकेत प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी शतकी खेळीकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स यांना वाटते.

आपली प्रतिक्रिया द्या