पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले! अबकारी करात कपात करण्याची केंद्र सरकारची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महागाई दिवसेंदिवस वाढत असताना केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात कपात करून देशातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरील अबकारी करात कपात केली आहे. यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 9 रुपये 50 पैशाने तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे. याशिवाय गॅस सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडीही देण्यात येणार आहे.

खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती आणि सततची इंधन दरवाढ यामुळे देशातील सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सायंकाळी एकापाठोपाठ एक अशी 12 ट्विट करत पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात प्रतिलिटर 8 रुपये आणि 6 रुपये कपात करण्यात येत असल्याची घोषणा केली. यामुळे पेट्रोलचा दर 9 रुपये 50 पैसे आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात झालेली बिकट अवस्था, रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर वाढलेली महागाई या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने इंधनावरील अबकारी करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे केंद्र सरकारला 1 लाखकोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारांनी देखील कर कमी कराकेत, असं आवाहन अर्थमंत्री सीतारमण यांनी केलं आहे.

घरगुती वापराच्या गॅससाठी अनुदान

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरला अनुदान देण्यात येईल. 12 सिलेंडरपर्यंत 200 रुपये प्रति सिलेंडर अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. उज्वला योजनेतील 9 कोटी ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. गॅसवरील अनुदानामुळे केंद्राला दरवर्षी जवळपास सहा हजार कोटी रुपयांचा तोटा होईल, असं अर्थमंत्री सितारामण यांनी म्हटलं आहे.

आधी किमती वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा नको, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुनावले
आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रतिलिटर 18.42 रुपये इतका वाढविला होता आणि आज तो 8 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी वर देखील 18 रुपये 24 पैशांनी वाढविले आणि आता 6 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. सहा सात वर्षांपूर्वी असलेल्या अबकारी कराइतकी कपात केल्यास खऱया अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आजपासूनचे नवे दर
शहर पेट्रोल डिझेल
मुंबई 111.01 97.77
दिल्ली 95.91 89.67
कोलकाता 105.62 92.83
चेन्नई 101.35 102.94