आलिशान कार घ्यायला थेट हॅलिकॉप्टरमधून एण्ट्री

केरळमधील एका व्यावसायिकाने नवीन लक्झरी कार विकत घेण्यासाठी थेट हॅलिकॉप्टरमधून एण्ट्री घेतल्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. पोलंड मूसा असे या व्यावसायिकाचे नाव असून ते फ्रेग्रन्स वर्ल्ड या आंतरराष्ट्रीय परफ्यूम कंपनीचे मालक आहेत. मूसा यांनी बेंटले बेंटायगा इडब्ल्यूबी ही कार विकत घेतली. ही एक सुपर लक्झरी एसयुव्ही आहे. या कारची डिलिव्हरी घेण्यासाठी मूसा स्वतः लॅलिकॉप्टरने आले होते. या गाडीची किंमत 6 कोटींपासून सुरू होते आणि व्हेरिएंट नुसार त्यात बदल होतो.