
आपण संपलेल्या पक्षाबाबत बोलत नाही. तसेच स्टंटबाजीला आपण भाव देत नसल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच संपलेल्या पक्षाला आपण उत्तरे देत नाही, असेही ते म्हणाले. पत्रकारांनी त्यांना मनसे आंदोलनाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी कोणाचेही नाव न घेता चोख प्रत्युत्तर दिले आहे.
प्रभू श्री राम हे आपल्या हृदयात आहे. आपण जे काही करतो, ते त्यांच्या प्रेरणेनेच करतो. रघुकुल से रीत सदा चली आली, प्राण जाये पर वचन न जाये, या धोरणानुसारच आपले काम सुरू असते, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे स्टंटबाजीला भाव देत नसल्याचे तसेच संपलेल्या पक्षांना उत्तरे देत नसल्याचे त्यांनी सांगितले.




























































