कुणकेश्वरच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी देणार; पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची कोकण दौऱयात ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुणकेश्वर विकासासाठी  5 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. कुणकेश्वर येथील विविध विकास कामांचे उद्घाटन आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, सरपंच चंद्रकांत घाडी, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लबधे आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिह्यात पर्यटनासाठी मोठा वाव असल्याचे सांगून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, येथील निसर्ग खूप सुंदर आहे. पर्यटन वाढीसाठी शासन कटिबद्ध आहे. पर्यटकांची संख्या वाढावी या साठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील.  या वेळी प्रादेशिक पर्यटन योजनेतून पूर्ण झालेल्या कुणकेश्वर मंदिरामागील रस्त्याचे खडीकरण, मंदिराजवळील  बांधकाम, प्रवेशद्वाराचे बांधकाम, मंदिराची संरक्षक भिंत, समुद्रकिनाऱयावरील प्रेक्षक गॅलरी बांधकाम व मंदिर परिसरातील पेव्हर ब्लॉक या कामांचे लोकार्पण करण्यात आले.