उन्नाव सामूहिक अत्याचार : माजी भाजप आमदार  कुलदीपसिंह सेंगरचा 20 डिसेंबरला फैसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सामूहिक अत्याचार खटल्यात दोषी ठरलेला भाजपचा माजी आमदार कुलदीपसिंह सेंगर याचा येत्या 20 डिसेंबरला फैसला होणार आहे. आज त्याच्या शिक्षेबद्दल दिल्ली येथील न्यायालयात सुनावणी झाली. येत्या शुक्रवारी पुन्हा युक्तिवाद होणार असून त्याच दिवशी न्यायालय अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे.

सेंगर याला जास्तीत जास्त शिक्षा ठोठावली जावी अशी मागणी सीबीआयने आज केली. ज्या कलमांखाली सेंगर याला दोषी ठरवले गेले आहे त्यात दहा वर्षे कैद आणि जास्तीत जास्त जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. बलात्कारपीडितेचे आयुष्यच उद्ध्वस्त होते आणि जीवनभर तिला मानसिक खच्चीकरणाचा सामना करावा लागतो असे सीबीआयच्या वकिलांनी सांगितले.